राहुल गांधींना मी अद्याप नेता मानत नाही, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य !

राहुल गांधींना मी अद्याप नेता मानत नाही, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य !

नवी दिल्ली –  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे नेते आहेत असे मी मानत नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी केलं आहे. राहुल गांधी यांना जनतेने अद्याप नेता म्हणून स्वीकारलेले नाही. सध्या राहुल गांधी शिकत आहेत. जेव्हा जनता त्यांना स्वीकारेल तेव्हाच ते नेते होतील असही भारद्वाज यांनी म्हटलं आहे. एवढेच नाही तर काँग्रेस पक्षाकडून धर्माचे राजकारण होत असल्याने हा पक्ष अपयशी ठरत असल्याचा घरचा आहेरही भारद्वाज यांनी दिला आहे.

दरम्यान आगामी निडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानं राहुल गांधींबाबत हे वक्तव्य केलं असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तसेच यापूर्वीही राहुल गांधी यांच्यावर पक्षातील काही नेत्यांनी टीका केली होती.  राहुल गांधी यांना जेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले, तेव्हाही राहुल गांधींवर काही ज्येष्ठ नेत्यांनी टीका केली. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपाला काटे की टक्कर देण्याची धमक आपल्यात आहे हे राहुल गांधींनी दाखवून दिले होते. यानंतरही भारद्वाज यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या विरोधात नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS