धक्कादायक, नगरसेविकेच्या पतीकडून 10 वर्षांच्या मुलीवर 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार !

धक्कादायक, नगरसेविकेच्या पतीकडून 10 वर्षांच्या मुलीवर 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार !

कोल्हापूर -कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.  नराधम नितीन दिलीप लायकर (वय 40, रा. साखरपे हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी) याने स्वतःच्याच दहा वर्षीय मुलीवर 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले आहेत. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी याच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन लायकर यास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून लायकर हा नगरसेविकेचे पती असून मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील वलय असलेला नितीन लायकर याची कृष्णकृत्ये उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान नितीन लायकर हा विद्यमान नगरसेविकेचा पती आहे. 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन वर्षापासून तो अत्याचार करत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. टीव्ही मालिका क्राईम पेट्रोलमधील बलात्काराचा कार्यक्रम दाखविणे, याबरोबरच अश्लील चित्रफीत दाखवून इतर घृणास्पद प्रकार नितीन याने मुलीशी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याने मुलीच्या अंगाचेही चावे घेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न ही वारंवार केला आहे. त्याचबरोबर इतरही किळसवाणे प्रकार तो मुलीसोबत करायचा वारंवार अडवणूक करूनही नितीन याचे मुलीवर अत्याचार करण्याचे प्रकार थांबत नसल्याने याबाबत आज मुलीच्या आईने स्वत: पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याच्यावर बलात्कार, लहान मुलावरील लैंगिक अत्याचार (पोक्सो) तसेच भा.द.वि.स. कलम 324 आदीन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नितीन लायकर याला गजाआड केले आहे. त्याने सावकारी केल्याचे ही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. करवीरनगरीतील इचलकरंजीत नात्याला काळीमा फासण्याचे कृत्य एका बापाकडून झालय. ज्याचा करावा तितका निषेध कमी असून अशा विकृताला भर दसरा चौकात गोळ्याचं घालायला हव्यात. राज्यातील तमाम मातृशक्ती या धाडसी मातेच्या पाठीशी असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS