करोना विषाणूची राज्य शासनासोबत चर्चा झाली का? – इम्तियाज जलील

करोना विषाणूची राज्य शासनासोबत चर्चा झाली का? – इम्तियाज जलील

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये नवा करोना विषाणू सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपरोधत्मक टोला मारत ‘करोना विषाणूने राज्य शासनासोबत काही चर्चा केली आहे का? असे ट्विट केले आहे.

नव्या कोरोना विषाणूमुळे केंद्र सरकारने ब्रिटनमधील विमानसेवा बंद केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

‘करोना विषाणूने राज्य शासनासोबत काही चर्चा केली आहे का? मी दिवसा झोपेन आणि रात्री बाहेर पडेन असे या विषाणूने सांगितले आहे का?’, असे उपरोधिक सवाल करत जलील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

COMMENTS