पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मोठी दुर्घटना , मंडप कोसळून 20 जण जखमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मोठी दुर्घटना , मंडप कोसळून 20 जण जखमी

पश्चिम बंगाल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील सभेत मंडपचा काही भाग कोसळल्याने मोठा अपघात घडला असून त्यात 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळतीय. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंंय.

दरम्यान, मोदींच भाषण सुरू असताना अचानक मंडप खाली पडला. त्यावेळ मोदी थांबले आणि त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजी कमांडोला काय प्रकार घडला आहे ते पाहण्याचे आदेश दिले. त्यावर त्यांना मंडप पडल्याचं समजंल. जखमींना रुग्णालयात नेण्याची सोय करण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. सतत पाऊस पडत असल्याने मैदानातील माती ओली झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारानंतर नरेंद्र मोदी रुग्णालयात पोहचलेे आणि त्यांनी मंडप कोसळून जखमी झालेल्यांची विचारपुस केली. यावेळी नरेंद्र मोदींना अश्रू अनावर झाले.

हा मंडप पडला कसा याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, दरवर्षी पंतप्रधान यांच्या सुरक्षेसाठी 350 कोटी खर्च केले जातात, परंतु देशाचे पंतप्रधान हे सुरक्षित नसल्याचं या घटनेनंतर समोर आलंय.

 

COMMENTS