एसटीतून प्रवास करणाऱ्यांनो खिश्यात जास्तीचे पैसे ठेवा, मध्यरात्रीपासून तिकीट महागणार!

एसटीतून प्रवास करणाऱ्यांनो खिश्यात जास्तीचे पैसे ठेवा, मध्यरात्रीपासून तिकीट महागणार!

मुंबई- एसटी तिकीट दरात 18टक्क्याने वाढ करण्यात आली असून आज मध्यरात्री पासून वाढत्या तिकिट दरा प्रमाणे दर आकारले जातील अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. वाढलेलं इंधन दर आणि एसटी कर्मचाऱ्यांची नुकतीच केलेली वेतनवाढ यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर अधिक भार पडत असल्याने तिकीट दरात वाढ करण्यात आली असल्याच सांगण्यात आलं आहे. नाईलाजास्तव दरवाढ करण्यात आल्याच महामंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. हा वाढता दर महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस ना लागू पडेल.
याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही 5 रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचे तिकीट 7 रुपये असेल तर त्याऐवजी 5 रुपये आकारले जातील. तसेच 8 रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे. या दरवाढी मुळे सामान्य जनतेच्या खिश्यावर भार पडणार हे मात्र नक्की.

COMMENTS