उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ !

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ !

मुंबई  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर गृह विभागानं हा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरेंची सुरक्षा झेडवरुन झेड प्लस करण्यात आली आहे तर आदित्य ठाकरेंची सुरक्षा एक्सवरुन व्हाय प्लस करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान गुप्तचर विभागाने ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या अहवालानंतर तात्काळ त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभोवताली मोठी सुरक्षा वाढली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS