लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला धक्का, वाचा इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा सर्व्हे !

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला धक्का, वाचा इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा सर्व्हे !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार याबाबतचा अंदाज विविध माध्यमांकडून वर्तवला जात आहे. India TV-CNX नंही सर्व्हे केला असून या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या सर्व्हेनुसार भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून काँग्रेसला फक्त ९७ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सर्वेनुसार, २०१४ च्या तुलनेत एनडीएला महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशमध्ये फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला असून उत्तर प्रदेशात भाजपला ४५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीला ३४ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.

दरम्यान मित्रपक्षासह भाजपला २७५ जागा मिळतील, तर यूपीएला १४७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला असून इतर पक्षांना १२१ जागा मिळतील असही या सर्व्हेत म्हटलं आहे. अन्य पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला २८, बीजू जनता दलाला १४, शिवेसनेला १३, समाजवादी पक्षाला १५, बसपाला १४, राजदला ८, जदयुला ९ जागा मिळतील, असा अंदाज मांडण्यात आला आहे.

COMMENTS