भारताचा पाकला आणखी एक दणका, घुसखोरी करणारे विमान पाडले !

भारताचा पाकला आणखी एक दणका, घुसखोरी करणारे विमान पाडले !

नवी दिल्ली – भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिला असून जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात आले आहे. भारताच्या हवाई दलानं ही कारवाई केली असून विमान कोसळत असताना पॅराशूट देखील दिसले. मात्र, विमानातील पाकिस्तानी वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेले नाही. विमानातील वैमानिकाने पॅराशूटद्वारे उडी मारली असावी, अशी शक्यता आहे.त्यामुळे याबाबतचा अधिक तपास भारतीय सैन्य करत आहे.

दरम्यान बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आज सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे.

 

COMMENTS