छगन भुजबळ, नारायण राणेंबद्दल उद्धव ठाकरेंचं मत !

छगन भुजबळ, नारायण राणेंबद्दल उद्धव ठाकरेंचं मत !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला. या मुलाखतीत संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी परखडपणे उत्तरं दिली आहे. या मुलाखतीत शिवसेनेचे जुने नेते छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यावरही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंबद्दल काहीही न बोलल्याचे दिसून आले.

दरम्यान नारायण राणे पक्षातून भारतीय जनता पक्षात गेलेत ? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर, मी भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच छगन भुजबळ यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर तुम्हाला पेढे पाठवले. ज्या छगन भुजबळांनी शिवसेनेविरोधात, शिवसेनाप्रमुखांविरोधात वातावरण निर्माण केले. किंबहुना त्रास देण्याचा प्रयत्न केला, शेवटी त्यांना तुम्हाला पेढे पाठवावे लागले. यावर बोलताना, अनुभवातून जर त्यांना गोडपणा आला असेल तर मी काय करु असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

 

COMMENTS