चौकशीशिवाय अजित पवारांना तुरुंगात टाकावं अशी इच्छा आहे का?, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!

चौकशीशिवाय अजित पवारांना तुरुंगात टाकावं अशी इच्छा आहे का?, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!

मनंबई – चौकशीशिवाय अजित पवारांना तुरुंगात टाकावं अशी इच्छा आहे का? अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी  यांनी दिली आहे. सिंचन घोटाळ्यातील प्रतिज्ञापत्रात अजित पवारांना जबाबदार धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर टीका केली त्यावर ते बोलत होते. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु आहे. संबंधित यंत्रणांवर कोणताही दबाव नाही असही महाजन यांनी म्हटलं आहे.

सिंचन घोटाळ्याची चौकशी एसीबीमार्फत सुरु असून चौकशीत पारदर्शकता आहे. एसीबीने ही कारवाई केली असून त्यांना चौकशी करण्याचे अधिकार आहेत. आम्ही कोणत्याही तपास यंत्रणेवर दबाव टाकलेला नाही. निवडणूक किंवा अधिवेशन डोळ्यासमोर ही कारवाई करण्यात आलेली नाही असही महाजन यांनी म्हटलं आहे.

COMMENTS