बीडचे क्षीरसागर बंधू, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेंच्या बाप्पाच्या चरणी, राष्ट्रवादीला धोक्याची घंटा !

बीडचे क्षीरसागर बंधू, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेंच्या बाप्पाच्या चरणी, राष्ट्रवादीला धोक्याची घंटा !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू बीडचे नगराध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर यांनी आज सकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  क्षीरसागर यांची भाजपशी वाढती जवळीक जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला धोक्याची घंटा ठरू शकते हे निश्चित मानलं जात आहे.

दरम्यान जयदत्त क्षीरसागर हे मागील काही वर्षांपासून पक्षावर नाराज आहेत. पुतण्या संदीप क्षीरसागर यांना पक्षाने जास्त महत्त्व दिल्याने काका जयदत्त आणि भारतभूषण हे नाराज होते. जी प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तसेच विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत जयदत्त यांनी उघडपणे भाजपला मदत केली होती. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीने त्यांना प्रदेश उपाध्यक् पदी नियुक्ती दिली होती.

दरम्यान शुक्रवारी क्षीरसागर बंधूनी मुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री या दोघांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेऊन चर्चा केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. क्षीरसागर बंधूंची भाजपशी वाढती सलगी राष्ट्रवादीसाठी बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी डोखेदुखी ठरू शकते अशी चिन्हे आहेत.

COMMENTS