जळगावचा उमेदवार भाजपने अखेर बदलला, ‘यांनी’ भरला उमेदवारी अर्ज !

जळगावचा उमेदवार भाजपने अखेर बदलला, ‘यांनी’ भरला उमेदवारी अर्ज !

जळगाव – जळगाव लोकसभेचा उमेदवार भाजपने अखेर बदलला असून चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे.
एबी फॉर्मसहित उन्मेष पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळू उन्मेष पाटील, यांच्यासोबत शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

दरम्यान स्मिता वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावमध्ये उन्मेष पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा सामना पहायला मिळणार आहे.

COMMENTS