सांगलीत आघाडीची सरशी, जळगावमध्ये कमळ फुलणार, वाचा कोणाला किती जागा मिळणार ? महापॉलिटिक्सचा निवडणूक अंदाज !

सांगलीत आघाडीची सरशी, जळगावमध्ये कमळ फुलणार, वाचा कोणाला किती जागा मिळणार ? महापॉलिटिक्सचा निवडणूक अंदाज !

सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महापालिकेसाठी काल मतदान झालं. उद्या त्याची मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी आम्ही स्थानिक पत्रकार, स्थानिक राजकीय अभ्यासक, विविध पक्षाचे स्थानिक नेते यांच्याकडून निकालाबाबतचा अंदाज घेतला आहे. त्यानुसार सांगली महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता येईल असा अंदाज आहे. एकूण 78 जागा असलेल्या सांगली महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सर्वाधिक 22 ते 26 च्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे. तर त्याखालोखाल जागा राष्ट्रवादीला जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 20 ते 25 च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजप तिस-या क्रमांकवर राहण्याची शक्यता आहे. भाजपला 18 ते 24 च्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 1 ते 3 आणि स्थानिक आघाडी आणि अपक्षांना मिळून 4 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये दोन बड्या नेत्याच्या मुलांचा आणि एका बड्या नेत्याचा पराभव होईल असा अंदाज आहे.

कोणाला किती जागा मिळतील ?

सांगली महापालिका

एकूण जागा – 78

काँग्रेस – 22 ते 26  

राष्ट्रवादी – 20 ते 25  

भाजप  – 18 ते 24   

शिवसेना – 1 ते 3      

स्थानिक आघाडी आणि अपक्ष – 6 ते 8  

                        दुसरीकडे जळगाव महापालिकेत मात्र कमळ फुलण्याची शक्यता आहे. एकूण 75 जागा असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 38 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुस-या क्रमांकावर शिवेसना राहण्याची शक्यता आहे. 28 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 2 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्षांना 1 किंवा 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि मनसे तर भोपळाही फोडणं शक्य होणार नाही असा अंदाज आहे.

कोणाला किती जागा मिळतील ?

जळगाव महापालिका

एकूण जागा – 75

भाजप – 38 ते 45

शिवसेना – 29 ते 33

राष्ट्रवादी – 2 ते 5

अपक्ष   – 1 ते 2

COMMENTS