जालन्यात रावसाहेब दानवेंना ‘या’ आमदाराचं आव्हान,  काँग्रेसला दिला पाठिंबा!

जालन्यात रावसाहेब दानवेंना ‘या’ आमदाराचं आव्हान, काँग्रेसला दिला पाठिंबा!

जालना – जालना लोकसभा मतदारसंघात आणखी एका आमदारानं रावसाहेब दानवे यांना आव्हान दिलं आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. केवळ भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.मी काँग्रेसच्या बाजूने कधीच नव्हतो आणि असणारही नाही. मात्र रावसाहेब दानवेंना पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रावसाहेब दानवेंना आम्ही याठिकाणी जिंकू देणार नाही.जर शेतकऱ्यांना शिव्या देणारे दानवे येथे निवडून आले, तर आमची इज्जत पुन्हा खाली गेल्या शिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं होतं. परंतु आता दानवेंना पाडण्यासाठी आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS