…तर शिवसेना नेते अर्जुन खोतकर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून दानवेंविरोधात निवडणूक लढणार ?

…तर शिवसेना नेते अर्जुन खोतकर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून दानवेंविरोधात निवडणूक लढणार ?

मुंबई –  शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची घेतली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आदित्य ठाकरे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती आहे.

 

दरम्यान सेना-भाजप युतीनंतर अर्जुन खोतकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच युतीच्या घोषणेनंतरही त्यांनी आपण जालना लोकसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं. युती झाली असली तरी जालना लोकसभा मतदारसंघाचे मैदान मी सोडले नसल्याचा इशारा अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंना दिला होता. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर अशी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत. युती संदर्भात सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना असल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र जालना लोकसभेची शिवसेनेला सोडण्याची आमची मागणी असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज खोतकर यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम राहणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS