जळगाव महापालिकेत कमळ फुललं, काँग्रेस-राष्ट्रवादी झिरो !

जळगाव महापालिकेत कमळ फुललं, काँग्रेस-राष्ट्रवादी झिरो !

जळगाव – जळगाव महापालिकेत पहिल्यांदाच कमळ फुललं असून याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र झिरोवर गेली आहे. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहूमत मिळालं असून एकूण 75 जागांपैकी 57 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर शिवसेना 15 आणि एमआयएमनं 3 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या या विजयामुळे जळगाव महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेचे हेविवेट नेते सुरेश दादा जैन यांना तगडा झटका बसला आहे.

दरम्यान गेली 30 वर्ष या महापालिकेवर सुरेश दादा जैन यांचं वर्चस्व होतं. ते आता खालसा झालं आहे. भाजपनं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी निवडणुकीची संपूर्ण सुत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती. त्यांना राज्यपातळीवरील नेत्यांचंही मोठं सहकार्य झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्ण ताकद दिली होती. एकनाथ खडसे काही अपवाद वगळता या निवडणुकीपासून अलिप्त राहिले होते. तरीही भाजपनं जोरदार विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.

COMMENTS