काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे पुणे शहरात भव्य स्वागत !

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे पुणे शहरात भव्य स्वागत !

पुणे – केंद्र आणि राज्यातल्या जुलमी भाजपा सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने काढलेली जनसंघर्ष यात्रा ७ व्या दिवशी पुणे शहरात पोहोचली. पुणेकरांनी ठिकठिकाणी जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत केले. कात्रज येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनसंघर्ष यात्रा पुढे अप्पर, शनि मंदीर, तीन हत्ती चौक, तळजई झोडपट्टी, अरण्येश्वर मंदीर, राजीव गांधी ई लर्निंग स्कूल, कसबा विधानसभा मतदारसंघातील सारसबाग, दांडेकर पूल दत्तवाडी, मांगीरबाबा चौक, निलायम टॉकीज चौक, वसंतदादा पाटील पुतळा, नातू बाग, आप्पा बळवंत चौक शनिवारवाडा, केसरी वाडा येथे पोहोचली त्यानंतर बालगंधर्व रंगमंदीर, तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी चौक दीप बंगला चौक, गोखले नगर, चतुश्रृंगी परिसरात पोहोचली या सर्व ठिकाणी पुणेकरांनी जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत केले. पर्वती विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी पुष्पवृष्टी करून जनसंघर्ष यात्रेचे स्वागत केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे माजी मंत्री व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. डॉ.विश्वजीत कदम, आ. अनंत गाडगीळ आ. अमरनाथ राजूरकर, वसंत चव्हाण, माजी आ. उल्हास पवार, अभय छाजेड यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाले आहेत.

COMMENTS