भाजपला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते जसवंत सिहं यांचे चिरंजीव काँग्रेसच्या वाटेवर ?

भाजपला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते जसवंत सिहं यांचे चिरंजीव काँग्रेसच्या वाटेवर ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत असून ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे चिरंजीव आमदार मानवेंद्र सिंह हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा  आहे. मानवेंद्र हे राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील शिव विधानसभेतील आमदार आहेत. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार मानवेंद्र सिंह यांनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये जाण्याबाबत चर्चा सुरु केली असल्याची माहिती आहे. तसेच 22 सप्टेंबररोजी ते आपलं शक्तीप्रदर्शन करणार असून बाडमेर येथील पचपदरा येथे स्वाभिमान रॅलीचं आयोजन त्यांनी केलं आहे. या रॅलीमध्ये त्यांचे समर्थक आणि राजपूत समाज मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तसेच ही रॅलीच त्यांची भविष्यातील राजकीय ताकद ठरवणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानवेंद्र सिंह हे काँग्रेसकडे आपल्या समर्थकांकडून प्रस्तावर पाठवणार असल्याची माहिती आहे. तसेच याबाबत आपल्या समर्थकांसोबत चर्चा करुन त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्यास पाठिंबा दिला तरच ते काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेणार असल्याचीही माहिती आहे.

COMMENTS