मुस्लिम लीग आणि आरएसएस हे इंग्रजांचे एजंट होते – जावेद अख्तर

मुस्लिम लीग आणि आरएसएस हे इंग्रजांचे एजंट होते – जावेद अख्तर

कोल्हापूर – मुस्लिम लीग आणि आरएसएस हे इंग्रजांचे एजंट होते अशी जोरदार टीका गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे. तसेच आमदार वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा जावेद अख्तर यांनी समाचार घेतला आहे.बेवकुफ,जाहिल तू कोणाची नोकरी करत आहेस ? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल. 15 करोडचा ठेका तुम्हाला कोणी दिला आशा लोकांपासून सावध राहील, पाहिजे अशी टीका जावेद अख्तर यांनी केली आहे. हे विचार मुस्लिम लीग सारखेच आहेत असंही जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान देशातील युवक आज बेचैन आहेत. 36 विद्यापीठ खदखदत आहेत. भाजप हा देशातील अनोखा पक्ष असून तो आरएसएसची शाखा असल्याचंही जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. आरएसएस आणि मुस्लिम लीगचा नेता अर्ध्या तासासाठीही जेलमध्ये गेला नाही.स्वातंत्र्य चळवळीला तोडण्याचं काम या दोघांनी पूर्ण शक्तीने केलं. असंही ते म्हणाले आहेत.

काय म्हणालेत आमदार वारिस पठाण ?

एमआयआमचे मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. १०० कोटींवर (हिंदू) १५ कोटी (मुस्लीम) भारी पडतील असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका सभेत बोलताना वारिस पठाण यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारं हे वक्तव्य केलं. ‘ईंट का जवाब पत्थर, हे आता आम्ही शिकलोय. पण यासाठी एकत्र वाटचाल करावी लागेल. स्वातंत्र्य दिलं जाणार नसेल तर ते जबरदस्तीनं मिळवावं लागेल. ते म्हणतात की आम्ही स्त्रियांना पुढे करतो.आता तर केवळ वाघिणी बाहेर पडल्या आहेत तर तुम्हाला घाम फुटलाय. मग, आम्ही सगळे एकत्र आलो तर तुमचं काय होईल, हे समजून जा. १५ कोटी आहेत पण १०० कोटींना वरचढ आहोत, हे ध्यानात ठेवा’ असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध जावेद अख्तर यांनी केला आहे.

COMMENTS