शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत काय चर्चा झाली?, जयंत पाटील यांनी दिली माहिती!

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत काय चर्चा झाली?, जयंत पाटील यांनी दिली माहिती!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भाजप नेते एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बैठकीत खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली. एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.

COMMENTS