एकीकडे राहुल मोटेंसारखा उमेदवार, तर दुसरीकडे महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करणारा नेता – जयंत पाटील

एकीकडे राहुल मोटेंसारखा उमेदवार, तर दुसरीकडे महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करणारा नेता – जयंत पाटील

उस्मानाबाद – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली आहे. लोकांची दिशाभुल करून भाजपने सत्ता मिळवली आहे. देशातला नव्हे जगातला सर्वात श्रीमंत पक्ष भाजप असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आपण राहुल भैय्यांना हाताच्या फोडावणी मागचे तीन टर्म सांभाळलय, त्यामुळे या पुढेही त्यांना सांभाळा असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. एकीकडे राहुल मोटे यांच्या सारखा उमेदवार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करणारा नेता आहे. असा टोला जयंत पाटील यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे. ते उस्मानाबादमधील वाशी येथे बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादीच्या सातबारावर ज्या नेत्याचं नावे आहे ते जर पक्ष सोडण्याच्या तयारीत असतील तर कार्यकर्ते आणि मावळे शरद पवार यांच्या पाठीशी असतील असंही जयंत पाटील यांनी पदमसिंह पाटील यांचं नाव न घेता वक्तव्य केलं आहे. निष्ठेला विचाराला महत्त्व असते, ज्या पवारांनी तुम्हाला 15 वर्ष मंत्रीपद दिलं ते लोकं संकटाच्या काळात पक्ष सोडायच्या प्रयत्नात आहे, पवार साहेबांचा यांकडे लक्ष आहे असंही पाटील म्हणालेत.

पाच वर्षे आम्ही तुम्हाला सांगत होतो नोटबंद चुकीची केली, जीएसटी चुकीची केली पण त्यावेळी तुम्हाला आमचं चुकीचं वाटत होतं, मात्र आज अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत, कारखाने, कंपन्या बंद पडले आहेत. 2 कोटी युवकांनी जे इंजिनिअरिंग केलेले डॉक्टरेट केलेले आहेत त्यांनी 64 हजार जागांसाठी अर्ज केले आहेत, ही या देशाला मोदींची देणं आहे.

2016 साली मेक इन महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले होते 8 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार अशी घोषणा केली होती, मात्र तसं झालं नाही,देशातील सर्वात खोटारडा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते आशेने राष्ट्रवादीकडे पाहत आहेत. घाबरून जाऊ नका, शरद पवार यांच्या सारखं नेतृत्व ही तुमच्या आमच्या जमेची बाजू आहे, माझ्या भागात पूर होता, पवार साहेब लगेच आले, महाराष्ट्रातील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आणि महाराष्ट्रातील लोकांनी भरगोस मदत केली, ही शरद पवार यांची हाक आहे असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS