मनसे विधानसभा निवडणूक लढवणार का?, जयंत पाटील आणि राज ठाकरेंची भेट!

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार का?, जयंत पाटील आणि राज ठाकरेंची भेट!

मुंबई – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्ययामध्ये आज बैठक झाली आहे. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी ही बैैठक पार पडली. या दोन्ही नत्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे. ९ ऑगस्ट रोजी ईव्हीएम विरोधात मनसे आंदोलन करणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. तसेच राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? हा प्रश्न अद्याप कायम असुन त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान ईव्हीएम घालवा आणि बॅलेट पेपर परत आणा ही राज ठाकरे यांची भूमिका आहे. ९ ऑगस्टला ते ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही राज ठाकरे भेटणार आहेत. त्यापूर्वी आज जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

COMMENTS