पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब – जयंत पाटील VIDEO

पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब – जयंत पाटील VIDEO

मुंबई – मंत्रालयात विष घेणारे धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला वर्ष होते आहे. याप्रकरणी अजून दोषींवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि त्यांच्यासह तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर आत्महत्या करू असा इशारा धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिलाय. त्यामुळे धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. एक वर्षानंतरही जर दोषींवर कारवाई होत नसेल आणि नरेंद्र पाटील यांच्यावरही आत्महत्येचा इशारा देण्याची वेळ येत असेल, तर पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत लाजिरवाणी आणि शरमेने मान खाली घालायला लावणारी असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS