…तर राज्यपालांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावं – जयंत पाटील

…तर राज्यपालांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावं – जयंत पाटील

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 105 जागा मिळवून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला 11 नोव्हेंबरपर्यंत सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. परंतु भाजपानं नकार दिला तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावं’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.

भाजपाच्या कोअर कमिटीची रविवारी बैठक आहे. या बैठकीत भाजप सत्तास्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपाला सोमवारपर्यंत राज्यपालांना उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजप शिवसेनेची मनधरणी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु भाजप शिवसेनेची मनधरणी करु शकले नाही तर भाजपला बहूमत सिद्ध करण अवघड जाणार आहे. त्यामुळे भाजपनं बहूमत सिद्ध केलं नाही तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावं’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS