अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात –जयंत पाटील

अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात –जयंत पाटील

सांगली – राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर इस्लामपुरात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलत असताना त्यांनी अनेक पक्षातील नेते माझ्या संपर्कात असून राष्ट्रवादीमध्ये येण्याचं प्रमाण वाढत असल्याचं म्हटलं आहे. राज्यात पुन्हा समता अन् सर्वसामान्य बहुजन समाजाचा सन्मान करणारे, राष्ट्रवादी – काँग्रेस आणि मित्र पक्षांचे सरकार आणू , असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान आमदार जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर इस्लामपूर शहरात भव्य मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले. आ. पाटील यांची उघड्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लाम्मा चौकातून कचेरी चौकात आली. या मार्गावरील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. या मिरवणुकीत त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, दिलीपराव पाटील आणि अनेक नेते उपस्थित होते.

COMMENTS