पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्वीटवर जयंत पाटलांचं उत्तर, पाहा काय म्हणाले?

पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्वीटवर जयंत पाटलांचं उत्तर, पाहा काय म्हणाले?

मुंबई – मराठा आऱक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तरुणाने याचा उल्लेख केला आहे. बीडच्या केतूरा गावात ही घटना घडली आहे. १८ वर्षीय विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. यावर मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे. आरक्षणाबाबत आम्ही पूर्ण ताकदीने भूमिका मांडणार आहोत. निराश होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच राज्य सरकारच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत. त्यात कोणी अजून प्रयत्न करत असेल तर ते विरोधात नाही.

दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी यासंदर्भात ट्वीट करत राज्य सरकारने याबाबतीत पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन केले आहे.

त्यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवारांनी दिल्लीत याचिका केली. प्रत्येक जण मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे. या पक्ष विरोधी किंवा सरकार विरोधी भूमिका म्हणणे हा तर्क चुकीचा असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS