शरद पवार निवडणूक लढवणार का? जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण !

शरद पवार निवडणूक लढवणार का? जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

आज पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती. परंतु या चर्चेला तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

COMMENTS