विजयसिंह मोहिते पाटलांबाबत जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य!

विजयसिंह मोहिते पाटलांबाबत जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य!

पुणे – विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अनेक जणांना आमच्या पक्षात यायची इच्छा आहे. जे गेले आहेत त्यांचा विचार करण्याची गरज आहे, मात्र जे गेलेच नाहीत त्यांच्या बाबतीत बेरजेचे राजकारण करावे लागते असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शपथविधी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीतून शरद पवार सांगतील ते शपथ घेतील असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद देऊ नका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सल्ल्याचाही जयंत पाटलांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा अर्थ, मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी ‘मातोश्री’बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, असंही जयंत पाटील म्हणाले. तसेच अॅक्सिस बँकेतील सरकारी खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मागच्या सरकारचे कोणतेही निर्णय सरकार विनाकारण फिरवणार नाही, असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS