राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या, जयंत पाटलांनी जाहीर केली यादी !

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या, जयंत पाटलांनी जाहीर केली यादी !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.याबाबतची यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष तर पनवेल शहर, लातूर ग्रामीण यासाठी कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी कोंडाजी आव्हाड तर कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे यांची नियुक्ती केली आहे. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रविंद्र पगार तर कार्याध्यक्षपदी भारती पवार यांची नियुक्ती केली आहे. तसेच पनवेल शहराच्या कार्याध्यक्षपदी शिवदास कांबळे तर लातूर शहराच्या कार्याध्यक्षपदी अफसर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS