जयंत पाटील-फडणवीसांमध्ये ट्विटरवॉर, “सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे”, “तुमची दया येते”!

जयंत पाटील-फडणवीसांमध्ये ट्विटरवॉर, “सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे”, “तुमची दया येते”!

मुंबई – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यामध्ये ट्विटरवॉर सुरु झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नाकाखाली लागणारे ‘फ्री काश्मीर’चे फलक कसे खपवून घेतात? असा सवाल काल फडणवीस यांनी केला होता. यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं असून तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचं ट्वीटरवर जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यानंतर ट्नीटरवरुन फडणवीस यांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

जयंत पाटील ट्वीट

‘देवेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही आत्मनिग्रह हरवून बसला आहात?’ असा प्रतिप्रश्न जयंत पाटलांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट

जयंत पाटलांच्या ट्वीटला देवेंद्र फडणवीस यांमी उत्तर दिलं आहे. ‘तुमची दया येते! आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. जयंतराव, हे वोट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर आधीच भेदभावापासून मुक्त आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत. सरकारमध्ये असो किंवा विरोधीपक्षात, आमचं एकच तत्त्व ‘राष्ट्र सर्वप्रथम’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील ट्वीटरवार रंगलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS