अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार जयंत ससाणेंचं निधन !

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार जयंत ससाणेंचं निधन !

अहमदनगर  – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयंत ससाणे यांचं दुःखद निधन झालं आहे. आज पहाटे श्रीरामपूर येथे त्यांचं निधन झालं असून ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता श्रीरामपूर येथील अमर धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी श्रीरामपूरचे १० वर्षे आमदार आणि १५ वर्षे नगराध्यक्षपद भूषवले होते.

दरम्यान ससाणे हे शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष होते. श्री साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. साई आश्रम भक्त निवास, प्रसादालाय, शहरातील रस्त्यांचे भूसंपादन, विमानतळ उभारणीसाठी निधी अशी महत्त्वाची कामे त्यांनी केली आहेत. तसेच श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतानाही त्यांनी भरीव कामगिरी केली होती. पाणी योजना, रस्ते, दुभाजकाचे सुशोभीकरण, झोपडपट्टी मुक्ती इत्यादी कामे ससाणे यांनी केली आहेत.

 

COMMENTS