झारखंडमध्ये ‘धनुष्य-बाणा’ची ‘कमळा’वर मात, 27 डिसेंबरला शपथविधी सोहळा !

झारखंडमध्ये ‘धनुष्य-बाणा’ची ‘कमळा’वर मात, 27 डिसेंबरला शपथविधी सोहळा !

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीत अखेर भाजपचा पराभव झाला असून शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धक्का दिला आहे. झारखंडमध्ये 41 हा बहुमताचा आकडा आहे. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालं आहे. काँग्रेस आघाडीने 81 पैकी 47 जागा मिळवल्या आहेत तर सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं. या विजयानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करणार आहे.

दरम्यान महाआघाडीचे नेते हेमंत सोरेन येत्या 27 डिसेंबरला झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती आहे. रांचीतील मोराबादी मैदानात हेमंत सोरेन यांच्यासह जेएमएमचे 6, काँग्रेसचे 5 आणि आरजेडीचा 1 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

पराभवानंतर सामनातून भाजपवर टीका

भाजपच्या या पराभवानंतर आता शिवसेनेनंही भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे.
‘नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. लोकांनी ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत,’ अशी .

‘लोकांनी ठरवलं की ते हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालेच. झारखंडही बेडरपणे बदलाला सामोरे गेले. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार,’ असा टोलाही शिवसेनेनंही सामनातून लगावला आहे.

COMMENTS