बहुजन समाजातील मोठ्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द उच्चारणे माझ्या रक्तात नाही – जितेंद्र आव्हाड

बहुजन समाजातील मोठ्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द उच्चारणे माझ्या रक्तात नाही – जितेंद्र आव्हाड

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकरांबाबत केलेल्या ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. मल्हारराव होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करून मोठं राज्य स्थापन केले. त्यांना कोणताही वारसा नव्हता. सामान्य माणूस किती मोठं कर्तृत्व दाखवू शकतो असे म्हणायचे होते पण त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. या ट्विटमुळे वाद निर्माण होऊ नये यासाठी ते १५ मिनिटामध्ये डिलिट करण्यात आले.बहुजन समाजातील अशा मोठ्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द उच्चारणे माझ्या रक्तात नाही. तरीही बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो’ असे ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केले होते. मात्र ट्विटविरोधात संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर 15 मिनिटांतच त्यांना ट्विट डिलीट केलं. जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हॉट्सअॅप व फेसबुकवर व्हायरल झाले होते. यानंतर होळकर प्रेमींनी आव्हाड यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. परंतु आव्हाड यांनी त्यानंतर आपल्याला काय म्हणायचे होते याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

 

COMMENTS