जितेंद्र आव्हाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !

जितेंद्र आव्हाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी आव्हाड यांनी मनसे अध्यक्षांकडे केल्याचं समजतंय. कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून नजीब मुल्ला हे आव्हाड यांचे कट्टर समर्थक रिंगणात आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मोरे तर भाजपकडून निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना काँग्रेस,शेकाप या पक्षांचा पाठिंबा आहे. मुंबईमध्ये मनसेनं महाराष्ट स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तसं पत्रक त्यांनी काढलं आहे. त्यामुळे कोकण पदवीधरमध्ये आता मनसे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.

COMMENTS