त्यामुळे आरजे मलिष्का नशीबवान आहे – जितेंद्र आव्हाड

त्यामुळे आरजे मलिष्का नशीबवान आहे – जितेंद्र आव्हाड

मुंबई – मुंबई तुला माझ्यावर भरवसा नाही का?
हे गाण आरजे मलिष्काने काढलं,त्यामुळे मलिष्का नशीबवान आहे, कारण तिला महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यावर घेऊन गेले.आम्ही कित्येक वर्षे इथे ओरडतोय आमच्यासोबत एखादी बैठक घ्याविशी त्यांना वाटलं नाही असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

नालेसफाईनंतर कचरा नाल्याच्या काठावर ठेवला जातो, ठेकेदाराला कितीही सांगितले तरी तो उचलत नाही. पावसात पुन्हा तो कचरा पाण्यात आणि त्याची बिलं काढून पुन्हा टेंडर घ्यायला ठेकेदार मोकळे होतात अशी टीकाही आव्हाड यांना सभागृहात केली आहे.

नवाब मालिकांच्या घरात पाणी घुसलय. ते पुन्हा घर उभं करतील पण ज्या गरीबाच्या घरात पाणी घुसलंय तो उध्वस्त होतो. अशा गरिबांच्या घरी मलिष्काला घेऊन जाता का? तुम्हाला मलिष्का लागते, गरीब जनता नको, आमदार नको? असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच वरळीचा सर्वात मोठा नाला ओंकार बिल्डरने छोटा केला, काहीही कारवाई केलेली नाही. मुंबईतील सर्व नाले बिल्डरने लहान केलेत असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान यावेळी आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांनी मुंबई -ठाण्यातील आमदारांची बैठक घ्यावी अशी मागणीही केली आहे.

COMMENTS