मी मृत्यूच्या दाराला स्पर्श करून आलो, कोरोनावर मात करुन आलेल्या जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया  !

मी मृत्यूच्या दाराला स्पर्श करून आलो, कोरोनावर मात करुन आलेल्या जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया !

मुंबई – कोरोनावर मात करुन आल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी कोरोनामुळे आपल्या आयुष्यात मोठे बदल झाले असल्याचं म्हटलं आहे. आता माझी प्रकृती आता बरी आहे. देवाने शिस्त लावण्यासाठी, एक मर्यादा पाळण्यासाठी हे दिलं होतं असं वाटतं. या आजारातून एक शहाणपण मिळालं. आता माझी मुलगी मला मॉनिटर करते. माझ्या जेवणाच्या वेळांपासून ती सर्वकाही बघते. घरातही एक बदलेलं वातावरण अनुभवून बरं वाटतंय. मी कोरोनाच्याा मर्यादा पाळल्या नाहीत म्हणून मला हे भोगावं लागलं असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.या आजारातून आपण मृत्यूच्या दाराला स्पर्श करून आलो असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हॉस्पिटलमध्ये कसं पोहचलो आणि नंतरचे तीन-चार दिवस काय झालं हे मला माहीतच नाही. माझ्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत होता. पण मला त्यानंतर काय झालं हे काहीच आठवतं नाही. मी व्हेंटिलेटरवर होतो. त्या आजारासाठी व्हेंटिलेटर लावण्याची गरज असतेच. मला श्वास घ्यायला त्रास होत होता त्यासाठी व्हेंटिलेटर लावलं होतं असं आव्हाड म्हणाले.

मी अॅडमिट झालो तेव्हा हा क्षण माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी कसोटीचा होता.  मी अॅडमिट झालो, माझी बायको कोव्हीड पॉझिटीव्ह निघाली. सगळं मुलीवर येऊन पडलं. तिला डॉक्टरांनी सांगितलं. माझी 70 क्क केस हातातून गेली आहे. 30 टक्केचं केस आपल्या हातात आहे. ते ऐकून माझी मुलगी 15 मिनिटं वेड्यासारखी वागायला लागली आणि त्यानंतर माझ्या मुलीने सर्व हातात घेतलं असल्याचं या मुलाखतीत आव्हाड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS