पुरंदरेंना पद्मविभूषण हा शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धंदा – जितेंद्र आव्हाड VIDEO

पुरंदरेंना पद्मविभूषण हा शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धंदा – जितेंद्र आव्हाड VIDEO

मुंबई – बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ‘शिवद्रोही ब.मो. पुरंदरेंना पद्मविभुषण जाहिर….छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट…महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

‘महाराष्ट्र भूषण दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं करताय? का पोसताय?. जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती. सोलापुरात त्यांनी पुस्तकाचं कौतुक केलं होतं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS