ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड होते आरोपींची हिटलिस्टवर, नालासोपारा स्फोटकांप्रकरणी मोठा खुलासा !

ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड होते आरोपींची हिटलिस्टवर, नालासोपारा स्फोटकांप्रकरणी मोठा खुलासा !

मुंबई – नालासोपारा प्रकरणात आज एटीएसनं मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे आरोपींच्या हिटलिस्टवर होते अशी माहिती समोर आली आहे. अविऩाश पवारच्या डायरीत ही नोंद असल्याची माहिती एटीएसने आज कोर्टात दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शाम मानव, दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर आणि रुतू राज हेही हिटलिस्टवर असल्याची माहिती आहे.

गौरी लंकेश हत्ये प्रकरणी अटक असलेल्या अमोल काळेचा उल्लेख पहिल्या रिमांड पासून एटीएसने केला आहे, मग अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्ता पर्यंत काय केलं. अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी अद्याप एटीएसने कोणत्याही हालचाली न केल्याच उघड झालं आहे. नालासोपारा स्फोटकं प्रकरणी अटक आरोपी अविनाश कळसकर आणि  आरोपिंची संबध काय असाही सवाल कोर्टानं एटीएसला केला आहे.  अविनाश कळसकरकडून पाच मोबाईल आणि २ सिम कार्ड जप्त करण्यात आले होते मात्र रिमांड अर्जात त्याचा उल्लेख नसल्याने कोर्टाने एटीएसला फटकारलं आहे.  कोर्टात येताना हाल्फ हार्टेडली येऊ नका, त्याचा आरोपीला फायदा होऊ शकतो. याप्रकरणी उत्तर देण्यासाठी एटीएसला दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे.

COMMENTS