विरोधी पक्षातील “या” नेत्यावर माझी मोठी श्रद्धा होती, पण… – जितेंद्र आव्हाड

विरोधी पक्षातील “या” नेत्यावर माझी मोठी श्रद्धा होती, पण… – जितेंद्र आव्हाड

मुंबई – 2001 मध्ये गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी आपल्याला विधान परिषदेवर घेऊ अशी ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सरकारनामाच्या फेसबूक लाईव्हमध्ये बोलताना आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 2001 मध्ये एके दिवशी सकाळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोन आला. तुला आम्ही भाजपकडून विधान परिषदेवर पाठवायचं ठरवलं आहे. दोन टर्म देतो. बाळासाहेबांशीही बोलून घेतो. तु तुझ्या पत्नीची बोलून घे. मात्र मी पत्नीशी चर्चा केलीच नाही. मला ते शक्य नाही. मी कोणत्याही बाबती तडजोड करेन पण पवार साहेबांना सोडणार नाही असं मी पत्नीला सांगितलं. नंतर पत्नीने मुंडे साहेबांना फोन केला. तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचंही तुमच्यावर प्रेम आहे. मात्र पवार साहेबांना तो सोडू शकत नाही. एकवेळ मला सोडेन पण पवार साहेबांना सोडणार नाही असं पत्नीनं मुंडे साहेबांना सांगितलं अशी आठवण आव्हाड यांनी सांगितली.

विरोधी पक्षातला असा कोणी नेता आहे का ?  ज्यांनी तुम्हाला मदत केली, या प्रश्नावर आव्हाड यांनी भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेतलं. त्यांच्या मदतीची एक आठवणही आव्हाड यांनी सांगितली. माझ्यावर एकदा एक मोठा प्रसंग आला होता. एका केसमध्ये मला अकडवण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्या सास-यांनी मुंडे यांना फोन केला. तेंव्हा मुंडे यांनी मला बोलावून घेतले आणि संबंधित अधिका-याची कानउघडणी केली. त्याच्या आधीच काही दिवस मी मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेतील आमचे चार सदस्य पळवले होते त्याविरोधीत मी त्यांच्या घरावर हजारो लोकांचा मोर्चा नेला होता. तसं असतानाही त्यांनी मला मदत केली अशी आठवण आव्हाड यांनी सांगितली.

COMMENTS