जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा बोलबाला, भाजप प्रणित अभाविपला एकही जागा नाही !

जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा बोलबाला, भाजप प्रणित अभाविपला एकही जागा नाही !

नवी दिल्ली – देशात विविध मुद्दावरुन नेहमीच चर्चेत असलेल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या पक्षांचा झेंडा फडकला आहे. चारही जागांवर डाव्या पक्षाच्या संघटनांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणज्ये अभाविपने सर्व ताकद लावूनही त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी अभाविपनं दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत 3 जागा जिंकल्या होत्या तर एनएसयूआयनं 1 जागा मिळवली होती.

डाव्या विद्यार्थी संघटनेचा एन साई बालाजी याने अध्यक्षपदाची निवडणुक जिंकली आहे. त्यानं अभाविपच्या ललित पांडे याचा 1179 मतांनी पराभव केला आहे. सारिका चौधरीनं उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. तिला 2692 मते मिळाली आहेत. सरचिटणीसपदी ए अहमद याची निवड झाली आहे. त्याला 2423 मते मिळाली. तर सह सरचिटणीसपदी अमुथा या विद्यार्थीनीचा विजय झाला आहे. तिला 2047 मते मिळाली आहे. जवळपास 5 हजार विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

COMMENTS