आघाडीला धक्का, काँग्रेस नेते कल्याण काळेंसह ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश!

आघाडीला धक्का, काँग्रेस नेते कल्याण काळेंसह ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश!

पंढरपूर – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कल्याण काळेंसोबतच माजी नगराध्यक्ष दगडू घोडके, सुरेखा पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कल्याण काळे यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीत माढ्यातून तब्बल 65 हजार मतं घेतली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान संजयामामा शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी घेतल्याचा राग भाजपला जिव्हारी लागला होता. यातूनच शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपनं कल्याण काळे यांच्या रुपाने हा वचपा काढला असल्याचं दिसत आहे. परंतु याचा भाजपला कितपत फायदा होणार हे आगामी निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS