कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रद्द करण्याची मागणी !

कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रद्द करण्याची मागणी !

मुंबई – कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत अपक्ष उमेदवरानं न्यायालयात धाव घेतली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील मतपेट्या 23 तासानंतर स्ट्राँग रुमला जमा करण्यात आल्या होत्या. याबाबत राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला मात्र याबाबत निवडणूक अधिका-यांनी देखील असमाधानकारक उत्तर न दिल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रा. के. शिवा अय्यर यांनी केला आहे. तसेच याबाबत शंका व्यक्त करत 23 मे रोजी होणारी कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात उद्या करण्यात येणार आहे.

कोण आहेत प्रा. अय्यर?

प्रा. अय्यर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्याविरोधात बेकायदा शाळा चालवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करुन त्यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होतीय यावेळी त्यांना जामीन दिला गेला नाही. जामीन नाकारल्याने त्यांना प्रचारासाठी वेळ मिळाला नाही. मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांना जामीन झाल्यावर त्यांनी कसाबसा प्रचार केला.

मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये पोहचण्यास का झाला
उशीर?

या लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. याठिकाणी 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.या सहा विधानसभा मतदारसंघापैकी मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघाच्या 355 मतपेट्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील स्ट्राँग रुममध्ये जमा झालेल्या नव्हत्या.याविषयी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी आवाज उठवला होता.निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर नोंदी प्रक्रियेत गडबड झाल्याने विलंब झाल्याचं कारण अधिकाऱ्यांनी सांगितलं. तब्बल 23 तासांनंतर मुंब्रा कळव्यातील मतपेट्या डोंबिवलीतील स्ट्राँग रुममध्ये आल्या.

COMMENTS