कल्याण, मुंबई लोकसभा मतदारसंघात युतीला धक्का, ‘या’ संघटनेचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा!

कल्याण, मुंबई लोकसभा मतदारसंघात युतीला धक्का, ‘या’ संघटनेचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा!

मुंबई – लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि कल्याण मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला जोरदार धक्का बसला असून आगरी-कोळी भूमिपूत्र महासंघानं संजय दिना पाटील आणि बाबाजी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीमधील निळजे गावात आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाची सभा पार पडली. सभेला हजरो आगरी-कोळी समाजाचे नागरीक उपस्थित होते.तर सर्व पक्षीय आगरी समाजचे नेते सुद्धा उपस्थित होते. यावेळी आगरी-कोळी समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष केणे यांनी आपल्या भाषणात समाजावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला आणि शिवसेना नगरसेवक व शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यावर टीका केली.

दरम्यान यावेळी मोरे यांची शेवटची निवडणूक आहे,संभाळून रहावे असा सल्लाही त्यांनी दिला. या सभेत मुबंई लोकसभेतील उमेदवार संजय दिना पाटील आणि कल्याण लोकसभेतील उमेदवार बाबाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मात्र भिवंडी लोकसभेत दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे असल्याने तेथील जनताच निर्णय घेईल आणि तो आम्हाला मान्य असेल असे आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष भारद्वाज चौधरी यांनी म्हटले आहे. आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघानं घेतलेल्या या निर्णयामुळे युतीला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS