“उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है”, कंगना राणौतकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकरी उल्लेख!

“उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है”, कंगना राणौतकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकरी उल्लेख!

मुंबई – अभिनेत्री कंगना राणौतनं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर तिने संताप व्यक्त केला आहे. तुमने जो किया अच्छा किया. उद्धव ठाकरे आज माझं घर तोडले आहे, उद्या तुमचे गर्वहरण होईल, असे कंगनाने म्हटले आहे. या ट्वीटमध्ये तिने उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते. फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटले आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटते, हे मला आज समजले. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र’ इसं कंगनानं म्हटलं आहे.

दरम्यान, कंगना रानौत मुंबई विमानतळावर येत असल्याने भारतीय कामगार सेनेने मुंबई विमानतळावर आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती आहे.

COMMENTS