बहुजनांना संभाजी भिडे ‘लेंडगा’ असं म्हणतात – कपिल पाटील

बहुजनांना संभाजी भिडे ‘लेंडगा’ असं म्हणतात – कपिल पाटील

मुंबई –  संभाजी भिडेंना अटक करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढण्यात आला. तसेच संभाजी भिडे यांच्या अटकेबाबत विधीमंडळातही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पहावयास मिळालं आहे. विधान परिषदेत संभाजी भिडे यांच्याबाबत बोलत असताना संभाजी भिडे हे बहुजनांचा उल्लेख लेंडगा असं करतात. सोनं बुडतं आणि लेंडगं तरंगतं असा उल्लेख संभाजी भिडेंनी केला असल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन करावं अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे.

दरम्यान भिमा कोरेगाव प्रकरणाला ३ महिने पूर्ण झाले असून एकबोटे यांना अटक करायला सरकारने टाळाटाळ केली. संभाजी भिडेंना का अटक होत नाही याबाबत चर्चा होणं गरजेचं असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तर कोरेगाव भीमामध्ये महिला आणि मुलांवर हल्ला झाला. त्यामुळे संभाजी भिडेंना अटक करणं गरजेचं आहे परंतु त्यांना अटक केली जात नाही. त्यामुळे यांना हे सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला आहे. तसेच यामुळे राज्यात जातीवाद फोफावत असू सरकार यावर उत्तर द्यायला तयार नाही त्यामुळे हे कसलं सरकार आहे? असा सवालही वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

 

COMMENTS