लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अभिनेत्री करिना कपूरची प्रतिक्रिया!

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अभिनेत्री करिना कपूरची प्रतिक्रिया!

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान ही काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं करिनानं स्पष्ट केलं आहे. ‘राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही विचार नाही, केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचं असल्याचं करिनानं म्हटलं आहे. तसेच मला कोणत्याही पक्षाने निवडणुकीबाबत विचारणा केलेली नसल्याचही करिनानं म्हटलं आहे.

दरम्यान करिना कपूरला भोपाळच्या जागेवर उमेदवारी द्यावी अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती.याठ्काणी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो. याशिवाय, करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून असल्यामुळे ती याठिकाणी विजयी होऊ शकते असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं. परंतु निवडणूक लढवणार नसल्याचं करिनानं स्पष्ट केलं आहे.

COMMENTS