कर्जत तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींवर महायुतीचं वर्चस्व, 17 पैकी ‘एवढ्या’ जागा जिंकल्या !

कर्जत तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींवर महायुतीचं वर्चस्व, 17 पैकी ‘एवढ्या’ जागा जिंकल्या !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
महायुतीनं ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ, ऊमरोली, वाकस, रजपे, टेम्भरे या ग्रामपंचायतींची शनिवारी निवडणूक झाली.या निवडणुकीचा निकाल हाती आला असून नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना, भाजप, रिपाईं महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे.

तालुक्यातील 17 पैकी 13 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे.नेरळ ग्रामपंचायतीसाठीच्या निवडणुकीत शिवसेनेचे 9, भाजपचे 4  उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिवसेनेकडे आले असून कर्जत तालुक्यातील उमरोली आणि जामरूख ग्रामपंचायतही शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.

दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS