‘रोहीत पवारांचा’ उमेदवारी अर्ज बाद, मतदारसंघात खळबळ!

‘रोहीत पवारांचा’ उमेदवारी अर्ज बाद, मतदारसंघात खळबळ!

अहमदनगर – कर्जत जामखेड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या रोहीत पवारांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. या मतदारसंघातील रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी, तालुका पाटोदा) या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाला आहे. परंतु राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रोहीत पवार यांचाच अर्ज बाद झाला असल्याची अफवा पसरली होती. परंतु प्रांताधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अधिकृत माहितीत या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे.

दरम्यान या मतदारसंघात एकूण 27 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले असल्याची माहिती आहे. रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी तालुका पाटोदा), शेख युनुस दगडू, रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरले आहेत. शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार यांनी अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले करण्यात आले असल्याची माहिती आहे.

COMMENTS