करमाळा बाजार समितीच्या निकालानंतर राडा, दिग्विजय बागल यांना बेदम मारहाण ! VIDEO

करमाळा बाजार समितीच्या निकालानंतर राडा, दिग्विजय बागल यांना बेदम मारहाण ! VIDEO

पंढरपूर – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड प्रक्रियेवेळी माजी आमदार जयवंत जगताप गटाकडून बागल गटाचे दिग्विजय बागल यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये बागल यांना बेदम मारहाण केली असल्याचं दिसत असून यामध्ये त्यांच्या अंगावरील कपडे देखील फाडले असल्याचं दिसत आहे. या मारहाणीप्रकरणी माजी आमदार जयवंतराव जगताप, पुत्र नगराध्यक्ष वैभव जगताप, शंभूराजे जगताप यांच्यासह आठ जणांवर करमाळा पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ३०७, ३२४,५०४, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी रिव्हाॅलवरने नाकावर मारले असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान करमाळा बाजार समितीमध्ये 30 वर्षानंतर सत्तांतर झालं असून राष्ट्रवादीच्या बागल गटानं याठिकाणी बाजी मारली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची ३० वर्षांची सत्ता उलथवण्यात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल गटास यश आलं आहे. त्यामुळे याठिकाणी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला मोठा धक्का बसला आहे. याच्याच रागातून जयवंतराव गटाच्या कार्यकर्त्यांनी बागल यांना बेदम मारहाण केली असल्याचा आरोप बागल गटानं केला आहे.

COMMENTS