कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकारला हादरा, दोन आमदारांनी काढला पाठिंबा !

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकारला हादरा, दोन आमदारांनी काढला पाठिंबा !

कर्नाटक – कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारला मोठा हादरा बसला आहे. दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. एच नागेश आणि आर शंकर अशी या आमदारांची नावे असून त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला असून दोन दिवसांपासून सरकार कोसळणार असल्याची चर्चा आहे. अशातच या आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे कुमारस्वामींच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच कर्नाटक सरकारमधील काही आमदारांनी मुंबईत येऊन भाजप नेत्यांशी चर्चा केली असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यानं केला होता. तसेच भाजपकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. अशातच या अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS